कडक लॉक डाऊन होणार पण...

Foto

सांजवार्ता एक्सलुझिव...


शहरातील वाढत्या रूग्ण संख्येवर आळा घालण्यासाठी लॉक डाऊन करायचे या निर्णयाप्रत प्रशासन आले असून उद्या लोकप्रतिनिधी आणि व्यापारी संघटनांसोबत कमीत कमी ५ आणि जास्तीत जास्त ७ दिवसांच्या कठोर लॉक डाऊनच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी सांजवार्ताला दिली. गेल्या आठ-दहा दिवसांपासून शहरात दररोज दिवसाकाठी दोनशेहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे पुन्हा लॉक डाऊन करा असा दबाव प्रशासनावर आला आहे. विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि व्यापारी संघटनासोबत अनेकदा चर्चा केली.  या चर्चेतून लॉक डाऊन करण्यात बाबत सर्वांचे एकमत झाले. तर गेल्याच आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत आठ दिवस शहराचे निरीक्षण करण्यात येईल त्यानंतरच लॉक डाऊन चा निर्णय होईल असे सांगितले होते. तेव्हापासून प्रशासनाने बारकाईने अभ्यास केला आणि लॉकडाउनच्या निर्णयावर प्रशासनाचा आले आहे.
 प्रशासनावर दबाव 
दरम्यान, राज्य अनलॉक या दिशेने चालल्याने आणि यापूर्वी अनेकदा लॉक डाऊन जाहीर केल्यानंतर आता पुन्हा लॉक डाउन कसे करावे असे संकट प्रशासनासमोर होते. दुसरीकडे उद्योग जगत पूर्वपदावर येत असताना आणि कोरोनासोबत जगण्याची सवय लावण्याचे आवाहन मुख्यमंत्री करीत असताना शहरात पुन्हा मोठा लॉकडाउन चा निर्णय कसा घ्यावा ? याबाबत प्रशासनात विचार मंथन झाले.  मात्र शहरातील लोकप्रतिनिधी आणि जनतेतही लॉक डाऊन हवा तशी भावना दिसून आली. सरकारचा अनलॉक निर्णय आणि स्थानिक परिस्थिती याच्या कचाट्यात प्रशासन अडकले. 
 लॉक डाऊन जास्तीत जास्त सात दिवसाचा ! शहरातील लोक प्रतिनिधी तसेच व्यापाऱ्यांनी लॉक डाऊन करण्याबाबत सहमती दर्शविल्याने प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला. असे असले तरी जास्त दिवस लॉक डाऊन करण्याच्या विचारात प्रशासन नाही. कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त सात दिवस लॉक डाऊन करावा यावर अधिकाऱ्यांचे एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे उद्याच्या बैठकीत जास्तीत जास्त सात दिवस लॉकडाऊन चा निर्णय होऊ शकतो.
 कठोर असेल लॉकडाऊन !
या वेळी मात्र पूर्वीप्रमाणे लॉक डाऊन मध्ये ढील झाली दिली जाणार नाही. जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही बंद असावीत ज्यामुळे रस्त्यावर गर्दी होणार नाही अशीही मागणी लोकप्रतिनिधी करीत आहेत. दुसरीकडे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे समजते. दवाखान्याशेजारी असलेले मेडिकल दुकानच उघडे राहील. पोलीस प्रशासनही यावेळी हयगय करणार नाही. शहर चारही बाजूंनी लॉक करण्यात येणार आहे.  पोलीस बळाचा वापर करण्यात मागेपुढे पाहणार नाही अशीही माहिती सूत्रांनी दिली.